Questions

पत्र लिहा। [6M]

🎯

Test yourself on this topic

1 question · timed · auto-graded

Question 16 Marks
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला : मैत्रिणीला लिहा.
Answer

अ.ब. क.
सुयश अपार्टमेंट,
गांधी मार्ग, मधली आळी,
पनवेल 400805
दि.10 जुन 2018

प्रिय मित्र सुनिल यास,
सप्रेम नमस्कार तुझे पत्र मिळाले. यावेळी मे महिन्यात आई बाबांबरोबर मी महाबळेश्वरला गेलो होतो. त्यामुळे तुला पत्र लिहू शकलो नाही.
महाबळेश्वर हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. अरे तिथले वातावरण तर खूपच सुंदर आहे. आम्ही तिचे सनसेट पॉईंटला गेलो होतो. तिथे इतका जोराचा वारा येतो की मला क्षणभर वाटले की मी ही वाऱ्याबरोबर उडून जातो की काय?
तसेच तेथे घोड्यावर रपेटही मारली. बोटींग केले. शेतातून काढलेली ताजी टवटवीत स्ट्रॉबेरीही आम्हांला खायला मिळाली.
तेथील बाजारात किती तरी हस्तकौशल्याच्या वस्तूही बघायला मिळाल्या. तेथील निसर्गरम्य वातावरणातून परत येण्याची इच्छाच होत नव्हती; पण काय करणार यावेच लागले. माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. तुझी खुशाली वरचेवर कळव.
तूबै एकदा महाबळेश्वरला जाऊन ये. तुझ्या आई बाबांना माझा शि. सा. नमस्कार. बाकी सर्व ठीक आहे.

तुझा मित्र.
अ. ब. क.

View full question & answer
पत्र लिहा। [6M] - मराठी STD 7 Questions - Vidyadip